चंद्रपुर येथे जिल्हा स्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर (मुली) टग ऑफ वार निवड चाचणी २०२४

चंद्रपूर :- महाराष्ट्र टग ऑफ वार असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मुली खेळाडूंना कळविण्यात येते कि, सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर (मुली) टग ऑफ वार महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 26 ते 28 जुलै 2024 दरम्यान गोंदिया येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाचा संघ सहभाग करण्याकरिता टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याची निवड चाचणी दिनांक 14 जुलै 2024 रोजी ठीक सकाळी 10:00 वाजता सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात येत आहे.

टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अनिस अहमद खान व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेण्यात येणार आहे. सदर निवड चाचणीत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना सोबत येताना आधार कार्डची 03 प्रत झेरॉक्स व 03 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे. उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या मुली खेळाडूंचे टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपूरच्या संघात निवड केली जाईल व निवड झालेला संघ गोंदिया येथे दिनांक 26 ते 28 जुलै 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार.

तरी इच्छूक खेळाडूंनी सहसचिव बंडू डोहे (7066666105), सौरभ बोरकर (8999851832), ईखलाख पठान (9834307243), रिंकेश ठाकरे (8007172073), हर्षल क्षिरसागर (706691570), राकेश ठावरी (8551976156), विश्वास इटनकर (9284537514), भास्कर मुळे (7249232813), सुनील देदवार (9890249339), सी. वर्षा घटे (7066703736), रुचिता आंबेकर (8552925066), शितल बोरकर (9552596479) यांच्याशी संपर्क साधावा.

निवड चाचणीचे नियम

01) U-17 वर्षांसाठी 04/08/2007 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.

02) U-19 वर्षांसाठी 04/08/2005 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.

03) खेळाडूने आधार कार्डची 03 प्रत झेरॉक्स व 03 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अजय पाटील यांना ‘मानद डॉक्‍टरेट’

Tue Jul 9 , 2024
नागपूर :- वनराई फाउंडेशनचे विश्‍वस्‍त, महाराष्‍ट्र राज्‍य वनसंरक्षक व वनपाल संघटनेचे अध्‍यक्ष , एशियाटीक बिग कॅट सोसायटीचे सचिव आणि बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे ( विदर्भ ) अध्‍यक्ष अजय पाटील यांना अमेरिकेच्‍या डब्‍ल्‍यूडी विद्यापीठातर्फे ‘मानद डॉक्‍टरेट’ बहाल करण्‍यात आली आहे. अजय पाटील यांनी वनविभागाचे वनमजूर, वनरक्षक, वनपाल यांच्‍यासाठी केलेले कार्य तसेच, एशियाटीक बिग कॅट सोसायटीच्‍या माध्‍यमातून वन्‍यजीव आणि वनांचे संवर्धनासंदर्भात केलेल्‍या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!