गडचिरोली : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली द्वारे यावर्षी प्रथमच जिल्हयातील सिरोंचा येथील उरूस तसेच विविध तालुक्यातील 11 यात्रा ज्यामध्ये सोमनुर, गुमलकोंडा, वेकंटापूर, वांगेपल्ली, चपराळा, मार्केडा, वैरागड, देऊळगांव- आवळगाव, पळसगाव, अरततोंडी, डोंगरी या ठिकाणी दिनांक 18 फेब्रुवारी पासुन महाशिवरात्री निमीत्ताने विविध यात्रांचे आयोजन जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीणा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर यात्रांमध्ये यात्रा आपत्ती व्यवस्थापनाकरीता प्रथमच जिल्हयातील प्रशिक्षीत 300 आपदा मित्रांचा समावेश करण्यात आलेला. जिल्हयातील विशेषत: मार्कंडा येथील यात्रेमध्ये नदीपात्रामध्ये कोणतीही अनुचित घटना घडु नये या करीता एसडीआरएफ नागपूर येथील 26 जवानांचे पथक, पोलीस विभागातील बचाव पथक, बोट व इतर बचाव साहित्यासह तसेच आपदा-मित्र व आपदा-सखी यांचे पथक मार्कंडा येथे यात्रा कालावधीमध्ये तैनात करण्यात आले होते. सदर केलेल्या उपाययोजनामुळे जिल्हयातील सर्व यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यात आलेल्या असून कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही. विशेषत: मार्कंडा येथे यात्रेमध्ये प्रंचड गर्दी अनुभवास मिळाली तसेच पळसगाव तालुका आरमोरी येथे दिनांक 26 फेब्रुवारी रोजी प्रंचड मोठया प्रमाणावर गर्दी आढळून आली. दरवर्षी वांगेपल्ली तालुका अहेरी तसेच देऊळगांव –आवळगाव यात्रेत अनुचित घटना घडायच्या मात्र या वर्षी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही तसेच यावर्षी देऊळगांव-आवळगाव मार्ग बंद करण्यात आलेला होता. आपत्ती व्यवस्थापनाचे दृष्टीने जिल्हयातील सर्व आपदा मित्रांनी महत्वपुर्ण भुमिका पार पाडलेली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून यावर्षी 12 यात्रांचे नियोजन यशस्वी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com