नागपूर :- जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व विनायक महामुणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिकलसेल कार्यक्रमात नागपूर जिल्हा महाराष्ट्रात अव्वल, आला असुन प्रकाश आबीटकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या हस्ते सन्मान आरोग्याचा 7 एप्रिल 2025 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमीत आयोजित कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे सत्कार करण्यात आला.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रेवती साबळे,सिकलसेल जिल्हा समन्वयक प्राजक्ता चौधरी व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सिकलसेल कामात राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करुन जिल्हा सिकलसेल विभाग मा.जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आरोग्य विभागाच्या कामावर समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. तसेच सिकलसेल सोबतच सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात आणखी चांगल्या पध्दतीने काम करुन जिल्हयातील जनतेला अतिषय उत्कृठ पध्दतीने आरोग्य सेवा प्रदान करण्याबाबत वेळोवेळी कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड जिल्हा माता बाल संगोपन अधिकरी, डॉ.रेवती साबाळे, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे, तालुका आरोग्य अधिकारी कामठी डॉ.सुरेश मोटे जिल्हा सिकलसेल समन्वयक प्राजक्ता चौधरी उपस्थीत होत्या.