संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता स्मृतिशेष दिलीप लक्ष्मणराव वानखेडे यांच्या जयंती प्रित्यर्थ शालेय साहित्याचे वाटप बौद्ध इतिहास संस्कृती संशोधन संस्था पूणे व नागार्जून संग्रहालय पुणे / नागपूर चे संस्थापक स्मृतीशेष दिलीप लक्ष्मणराव वानखेडे यांच्या ६५ व्या जयंती प्रित्यर्थ नवयुवक उच्च प्राथमिक शाळा कामठी व आरोही डिजीटल कॉन्व्हेन्ट स्कूल च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शाळेला डिजीटल फलक व अल्पहाराचे वाटप २ जानेवारीला करण्यांत आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिक्षाभूमी स्मारक समिती नागपूर चे सदस्य भदंत नागदिपंकर स्थवीर , प्रमुख अतिथी संस्था सचिव पंकज रडके , अर्पणा रडके , कुलदिप दिलीपराव वानखेडे , प्रमोद टेंभूर्णे , शुद्धोधन पाटील , अविनाश वानखेडे , अशोक वानखेडे , संजय वानखेडे , ईश्वर मेश्राम शाळेचे मुख्याध्यापक विजय नंदनवार उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार शेन्डे यांनी तर आभारप्रदर्शन दिलीप मस्की यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी राखी बागडे , मयुरी यादव , नाजुका मानवटकर व विभा सोनडवले यांनी प्रयत्न केले .