दुर्गम क्षेत्रातील आदिवासी मुलांना स्कुल बॅग वाटप 

– आसमान फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम 

नागपूर :- आसमान फाऊंडेशनतर्फे आदिवासी बहुल दुर्गम क्षेत्र भोरगड, काटोल येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेतील मुलांना स्कुल बॅगचे वितरण केले गेले. या निवासी शाळेत गरीब आदिवासी मुलांना नि:शुल्क शिक्षण दिले जाते. याप्रसंगी शालेय परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. आदिवासी शाळेच्या मुलांनी फाऊंडेशनच्या पदाधिका-यांचे पुष्प देवून स्वागत केले. डॉ.रवि गि-हे अध्यक्ष आसमान फाऊंडेशनचे यांनी या दुर्गम क्षेत्रातही एकात्मिका आदिवासी विकास प्रकल्प, नागपूरच्या अंतर्गत आदिवासी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा व अन्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्याबद्द्ल संतोष व्यक्त केला तसेच शासनाच्या सहयोगाने या भागात महिला बचत गट प्रशिक्षण केंद्र, युवा रोजगार केद्र व अन्य सामाजिक कार्याचे केंद्र बनविले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. आसमान फाऊंडेशन अशा विभिन्न सामाजिक कार्यात पूर्ण सहयोग करीत असते. शाळेचे अधिक्षक एस.बी. पोटोडे यांनी फाऊंडेशनच्या माध्यमाने केल्या जात असलेल्या विभिन्न कार्यक्रमाची प्रशंसा केली व आदिवासी मुलांना अधिकाधिक प्रोत्साहित करावे अशी अपेक्षा केली. याप्रसंगी सोनू बागडे, ब्लॉक ऑफिसर काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर विशेष आमंत्रित होत्या. फाऊंडेशनच्या वतीने सचिव नरेश शेंडे, भास्कर मुलताईकर, नरेंद्र विंचुरकर, दिनेश टेकाडे, आसमान महिला सोसायटीच्या अध्यक्ष मेघा गि-हे, उपाध्यक्ष विभा विंचुरकर, छाया मुलताईकर, कुंदा धकाते, अभिषेक पिंजरकर, रिमांश मुलताईकर उपस्थित होते. आदिवासी शाळेतर्फे शिक्षिका स्मिता मनोहर, पूजा व स्टाफ सदस्यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी घेतले चिंतामणीचे दर्शन

Tue Jul 9 , 2024
यवतमाळ :- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी कळंब येथे श्री चिंतामणी मंदीर देवस्थानला भेट दिली व चिंतामणीचे दर्शन घेतले. मंदीराच्या गाभाऱ्यात त्यांनी पुजा व आरती केली. मुख्यमंत्र्यांचे मंदीर देवस्थान येथे आगमण झाल्यानंतर संस्थानच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाभाऱ्यात जावून चिंतामणीचे दर्शन घेतले तसेच पुजा व प्रार्थना केली. संस्थानच्यावतीने त्यांचा संस्थानच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. श्री चिंतामणी सर्वांचे मंगल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com