सोनेगाव(डिफेन्स) :- गणेश नगर, दवलामेटी येथे नागरीकांना आरोग्य कार्ड वाटप वितरित करण्यात आले. आरोग्य कार्ड वाटपाचा कार्यक्रम अरविंद गजभिये यांच्या नेतृत्व व उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत ३५० नागरिकांना आमदार आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात युवा जिल्हा अध्यक्ष आदर्श पटले, आनंद बाबू कदम सरचिटणीस दवलामेटी सर्कल, अध्यक्ष प्रकाशजी डवरे , जिल्हा परिषद सदस्य सुजित नितनवरे, माजी उपसभापती प्रमोद गमे, आमदार समीर भाऊ मेघे, विजय गंथाडे, माजी उप सरपंच दवलामेटी गजानन रामेकर , वॉर्ड सदस्य सतीश खोब्रागडे , शितलताई वानखेडे , रश्मिताई पाटील, संयोजक प्रशांत श्रीवास्तव, मुन्नालाल टेंभरे, धनराज दिघोरे, छबीलाल यादव, नरेंद्र ओक, राजेश बावणे, संतोष सातपुते यांच्या उपस्थितीत दवलामेटी सर्कलच्या युवा वारियर्स अध्यक्ष पदासाठी पंकज टेमरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन धनराज दिघोरे यांनी व प्रशांत श्रीवास्तव यांनी आभार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे अरविंद गजभिये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत नागरीकांना आरोग्य कार्डच्या सर्व समस्या आणि फायद्यांची जाणीव करून दिली.
गणेश नगर, दवलामेटी येथील राहिवाश्यांना आमदार आरोग्य कार्ड वाटप
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com