संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळ माँ भगवती सेवा समिती कामठी तर्फे भाविकांसाठी सेवा उपक्रमा अंतर्गत येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना साबुददाणा नामक महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.महाशिवरात्रीच्या पाश्वरभूमीवर माँ भगवती सेवा समिती कामठी ने सामाजिक उत्तरदायित्वेची जाण ठेवत हा सेवा उपक्रम हाती घेतला असल्याचे मौलिक मत राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या महाप्रसाद वितरण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले. तसेच माँ भगवती सेवा समितीने दाखविलेल्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक होत आहे.
भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमातून लोकसेवा करण्याचा त्यांचा संकल्प निश्चितच प्रेरणादायी ठरेल असेही मत व्यक्त केले.
याप्रसंगी पूजा सफेलकर,शुभम खांडरे,प्रणय पैदलवार आदी उपस्थित होते.