वीज कर्मचा-यांकडून दिक्षाभुमी येथे माहिती पुस्तिका वितरण व भोजनदान संपन्न

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते यांच्या वतीने दिक्षाभुमीवर आलेल्या बंधु भगिनींसाठी भोजनदान आणि बाबासाहेब यांची ‘माझी आत्मकथा’ हे पुस्तक तसेच महावितरण च्या विविध योजनांची माहिती असलेली उपयुक्त पुस्तिका भेट म्हणून वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटक महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरणच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात म्हणून माहिती पुस्तिका वितरण करण्यात येत असल्याचे सांगितले, जनतेच्या वीजेसंबधी तक्रारी समजून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सदर उपक्रम भोजनदान व पुस्तक वितरण समितीने सुरु केला या उपक्रमात सर्व कर्मचारी अधिकारी अभियंते यांनी सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी मार्गदर्शन करतांना भोजनदाना पेक्षा दिक्षाभुमीवरुन बाबासाहेबांचे विचारांचे आदानप्रदान होणे तसेच पुस्तकांचे माध्यमातून ज्ञानभुक भागवणे हाच उद्देश असल्याचे सांगितले. तर प्रमुख पाहुणे महापारेषणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सतीश अणे, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिष गजबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला नागपुर ग्रामीण परिमंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक, निवृत्त अधिक्षक अभियंता गाणार, उमेश शहारे साहेब, सम्राट वाघमारे, धोंगडे, महानिर्मितीचे विंचुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मधुकर सुरवाडे यांनी तर आभारप्रदर्शन भैय्याजी रेवतकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभियंता कुणाल पाटील, प्रफुल्ल मेश्राम, भिमराव सोमकुंवर, नरेंद्र तिजारे, प्रमोद मेश्राम, अविनाश अंबादे, रणजित पानतावणे, शेंडे, वीरेंद्र मेश्राम, हेमंत सोळंकेसर, श्रीरंग मुत्तेपवार,सोनू बारसागडे, रमेश वाटकर, प्रकाश निकम, राजेश पोफळी,पांडुरंग कुकडे, लक्ष्मण वैरागडे, सुशांत श्रृगांरे, अविनाश पाटील, चंद्रशेखर तिजारे, पिरुसिंग राठोड, मनोज मेश्राम ,रामेश्वर भगत, मुकेश वानखडे, संजय भिष्णुरकर,प्रदिप नारनवरे, प्रकाश लोखंडे, प्रफुल्ल शंभरकर, गणेश शंभलकर, विनोद कोवे, संतोष हिरुळकर, महेंद्र पाचघरे, रवी दुरटकर, आशिष सोमकुवर, मंगला भांगे, सुमीत रेवतकर, गणपती सुरजागडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘घर घर संविधान’ हा बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान - ॲड. धर्मपाल मेश्राम

Tue Oct 15 , 2024
– महाराष्ट्रात घरोघरी होणार संविधानाचा जागर नागपूर :- भारतीय संविधानाला ७५ वर्ष झाल्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ‘घर घर संविधान’ अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय संविधान आणि संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे, अशी भावना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त करीत या महत्वपूर्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com