संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-कामठी तालुक्यातील आजनी येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत असलेल्या जवळपास पाऊणशे विद्यार्थी अन् विद्यार्थिनींना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे निमित्त साधून शुक्रवार दिनांक ३ मार्च २०२३ रोजी विश्व मानव रूहानी केंद्र, हरियाणाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
या साहित्यात शालेय बॅग, पिण्याच्या पाण्याची बॉटल, पेन्सिल,पेन, रबर, कंपास आदी शालेय उपयोगी साहित्य मिळाल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे. आजनी येथील उच्च प्राथमिक शाळेत शिकणारी मुले सामान्य घरची असून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या शाळेतील उत्सुक शिक्षकांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून शिक्षणाचा स्तर उंचावण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्या जात आहे. या शाळेतील विद्यार्थी आता स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय आदी सारख्या परीक्षा सुद्धा द्यायला लागले आहेत.
या शालेय साहित्य वितरण प्रसंगी गावातील उपसरपंच हेमराज दवंडे, गायत्री हरणे, हेमलता उकेबोंदरे, श्वेता चौधरी, झेडपी शाळेतील मुख्याध्यापिका कोलते, सावरकर, बुंदेले, करुणा ढोक, शांता ढोक, गावकरी सचिन ढोक, उत्तम ढोक, दशरथ नागोसे, संदीप पाल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.