अरोली :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत मांगली (तेली) कार्यालयासमोरील भव्य पटांगणात 6 फेब्रुवारी गुरुवारला स्वच्छता मोहीम अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबातील महिलेला प्रत्येकी एक प्रमाणे डस्टबिन चे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .घरातील केरकचरा घरासमोरील रस्त्यावर किंवा सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीवर न टाकता डस्ट बीन मध्ये टाकून, डस्टबिन भरल्यानंतर ग्रामपंचायत ने गावाच्या बाहेर बनवलेल्या कचराकुंडीत नेऊन टाकून, गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हा यामागील उद्देश असल्याचे सरपंच निशा रवींद्र फटिंग यांनी, याप्रसंगी आयोजित हळदी कुंकू च्या कार्यक्रमात गावातील समस्त महिला मंडळींना सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मौदा पोलीस स्टेशनचे पीएसआय जगणे, पोलीस कर्मचारी तुषार, बन्सोड, सामुपदेशिका महिला आयोग वैशाली चव्हाण, पोलीस पाटील स्नेहा साठवणे, मौदा पोलीस मित्र समिती अध्यक्ष नामदेव ठोंबरे , माजी सरपंच रवींद्र फटिंग ,अनुसया अर्जुन खंडाते उपस्थित होते. याप्रसंगी अतिथिंनी उपस्थित महिला मंडळाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंचा निशा रवींद्र फटिंग, मोनू कवडू साठवणे ,लंकेश्वर डोरले, माया धनराज उईके, शितल पतिराम मेश्राम, रोशन मोहतुरे, प्रीती बकाराम वऱ्हाडे, पिंकी गोपाल वाघाडे, त्र्यंबकेश्वर क्षिरसागर साठवणे, बंडू शंकरराव बुराडे, कर्मचारी विलास कोंडलवार, ऑपरेटर गीता साठवणे अंगणवाडी सेविका लीला डोरले व रोजगारसेवक निलेश फटिंग यांनी परिश्रम घेतले.