संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30:- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामठी येथील ड्रेगन पॅलेस टेम्पल येथे लाखोंचा संख्येने बौद्ध अनुयायी संपूर्ण भारत देशातून नमन करण्या करिता येत असतात,त्यांना पिण्याचा पाण्याची गैर सोय नको व्हायला पाहिजे या उद्देशाने भीम आर्मी संविधान रक्षक दल, तालुका कामठी च्या टीम च्या माध्यमातून पाणी कैन ने पेयजल चे वाटप करण्यात आले, ५०० कैन मध्ये १०,००० लिटर पाणी वाटप करण्यात आले,ह्या पाणी वाटप उपक्रम मध्ये प्रामुख्याने तालुका अध्यक्ष राहुल ढोरे,विनय खोब्रागडे, कामठी शहर अध्यक्ष अस्मिता बंसोड, बापू पाटील,तसेच नागपूर जिल्हा प्रवक्ता अमोल कुमार चिमनकर प्रामुख्याने उपस्थित होते.