कोदामेंढी :- येथील मतदान यादी भाग क्रमांक 161 अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक दोन मध्ये आज 13 नोव्हेंबर बुधवार दुपारपासून मतदान चिट्ठ्यांचे वाटप बीएलओ सूर्यकांता बावनकुळे घरोघरी जाऊन करत आहेत. कुटुंबा तील दुपारी उपस्थित असणाऱ्या कोणत्याही एका सदस्याला त्या कुटुंबात मतदार असणाऱ्या सर्व सदस्यांच्या मतदान चिट्ट्या ते देत आहेत व मतदान चिट्ट्या दिल्याचे पुरावे म्हणून कुटुंबातील उपस्थित सदस्याचे स्वाक्षरी घेण्यात येत आहे हे विशेष. मतदार असणाऱ्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांची चिठ्ठी काही कारणास्तव वाटप झाली नसल्यास त्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या घरी आणून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चार दिवसापूर्वी पासून या मतदान चिट्ट्यांचे वाटप सुरू असल्याचे यादी भाग क्रमांक 161 चे बीएलओ सूर्यकांता बावनकुळे यांनी विचारपूस केली असता सांगितले तसेच या यादी भाग क्रमांक 161 अंतर्गत नवीन अपडेट यादीनुसार एकूण मतदारांची संख्या 1102 असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येथे तीन मतदान यादी भाग असून, यादी भाग क्रमांक 160 मध्ये 1154 तर यादी भाग क्रमांक मध्ये 781 असे एकूण 3829 असलेल्या लोकसंख्येच्या मतदान केंद्र जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे असलेल्या कोदामेंढी गावात एकूण मतदार 3037 असल्याचे त्यांनी सांगितले. यादी भाग क्रमांक 160 चे बीएलओ माधुरी बावनकुळे तर 162 चे बीएलओ दुर्गा ढोमणे या सुद्धा चार दिवसांपूर्वी पासून त्यांच्या भागात मतदान चीट्ट्यांचे वाटप करत असल्याचे सूर्यकांता बावनकुळे यांनी सांगितले.
कोदामेंढीत बीएलओ तर्फे मतदान चिट्ठ्यांचे वाटप
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com