– प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पुर्ण होईल – चंद्रशेखर बावनकुळे
यवतमाळ :- राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकूल मंजुरी पत्र व 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पुणे येथून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उमरखेड येथे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास आ.किसन वानखेडे, आ.संजय कुटे, माजी आमदार नामदेव ससाणे, प्रकाश पाटील देवसरकर, विजय खडसे, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, महादेव सुपारे, नितीन भुतडा आदी उपस्थित होते. पुणे येथे आयोजित मंजुरी पत्र वितरण व घरकुल हप्ता वितरणाचे थेट प्रसारण करण्यात आले.
पुणे येथील कार्यक्रमात राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले. तसेच घरकुल मंजूर असलेल्या 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता वितरित करण्यात आला. मंजूर व हप्ता जमा केलेली सर्व घरकुले तातडीने पुर्ण होऊन लाभार्थ्यांना आपल्या घरात राहण्याचा आनंद प्राप्त झाला पाहिजे, असे केद्रीत गृहमंत्री अमित शहा म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वाधिक घरे महाराष्ट्राला मंजूर झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
ज्यांना स्वतःचे पक्के घर नाही, अशा प्रत्येकाला घर मिळणार आहे. प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण होईल, असे सांगून घरे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बावनकुळे यांच्याहस्ते सुकळी येथील दत्ता वानखेडे, जयवंत वानखेडे, देवजी वानखेडे, बोथा येथील अनुसया चव्हाण, भिकाबाई राठोड, अमानपूर येथील सुशिला आडे, पंचफुला जाधव, चिल्ली येथील मोतिराम राठोड, राजू राठोड, नागेशवाडी येथील बापुराव सुरोसे, शंकर सुरोसे, पळशी येथील विठ्ठल टिवरे, खुशाल जाधव, बापुराव कदम, वाळदी येथील रेखा वटाणे, वच्छला आडे, उत्तम राठोड, लिंबगव्हाण येथील प्रदिप वानखेडे, कुपटी येथील आशिष सुर्यवंशी, शिवाजी मोरे, दिवटपिंप्री येथील विलास सुर्यवंशी, नत्थू शिंदे, संता सुर्यवंशी व बारा येथील गजानन चव्हाण यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले.