लोकअदालतीत ३९९ प्रकरणांचा निपटारा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- तालुका विधिसेवा समितीच्या वतीने कामठी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात काल 3 मार्च ला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात ३९९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

लोकअदालतीसाठी दोन पॅनलचे नियोजन करण्यात आले होते. पॅनल एकमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायाधीश ए. ए. कुळकर्णी, तर पॅनल दोनमध्ये आर. आर. शेरेकर होते. पॅनल ॲड. म्हणून निकिता प्रदिप भोकरे यांनी काम पाहिले.

यात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी ३६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २ लाख ९७ हजार १३५ रुपयांची वसुली करण्यात आली. यासोबतच बैंक, ग्रामपंचायत,वीज बिलाच्या ८५० पूर्व प्रकरणांपैकी ३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून, ९ लाख २२ हजार ७५० रुपयांची वसुली करण्यात आली. अदालतीच्या आयोजनासाठी ॲड. संजय राव, ॲड. विलास जांगडे, ॲड. रिना गणवीर, ॲड. मृणाल भेलावे, ॲड. पंकज यादव, ॲड प्रफुल्ल फुडके, ॲड. मयूर बोरकर, ॲड. उमेश आकोने यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सायकल यात्रेतून आरोग्यासह पर्यावरणाचा संदेश

Mon Mar 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- जग बदलले आहे. सर्व सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहे. असे असले तरी खरी संपत्ती आरोग्य आणि पर्यावरण आहे मात्र सुदृढ आरोग्य आणि चांगले पर्यावरण हे आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीतजास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. झाडे लावून त्यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com