– मोरगावात- साकोली ची धनी शिवारात- मोहाडीत कारेमोरेंची घड्याळ सुरूच राहणार तर साकोलीत नाना पटोले यांच्या पंजाला आली बाय-बाय म्हणण्याची वेळ -दोन्ही ठिकाणांसह भंडारा जिल्ह्यात महायुतीचेच उमेदवार विजयी होण्याची शक्यता : धान कापणी करणाऱ्या लाडक्या बहिणी मजूर वर्ग
कोदामेंढी :- सध्या धानपट्टा म्हणून ओळखला जाणारा मौदा तालुक्यात धान कापणी युद्ध स्तरावर सुरू आहे .धान कापणी साठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भंडारा जिल्ह्यातील विविध गावांमधून मौदा तालुक्यातील विविध गावांमध्ये मजुरांचे समूह दाखल झालेले आहेत, तर काही मजुरांचे समूह दररोज चार चाकी वाहनाने जाने येणे करून धान कापणी करत आहेत.मोरगाव शिवारात आलेले मजूर वर्ग मोहाडी विधानसभा अंतर्गत येत असलेल्या बेटाळा गावातील अत्यंत जागृत असून त्यांना दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार ला विधानसभा निवडणुकीच्या दिवशी सकाळी दहा वाजता दरम्यान मतदानाविषयी विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की आम्ही मतदान टाकून आत्ताच गावात किरायाच्या चार जागी गाडीने आलेलो आहोत. तुम्ही आमच्या बोटांवर निळी शाही पाहू शकता. तुमच्या क्षेत्रातील निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची नावे तुम्हाला माहित आहे का ?असा प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की महाविकास आघाडीचे उमेदवार चरण वाघमारे (पंजा) तर महायुतीचे उमेदवार राजू कारेमोरे (घड्याळ)यांच्यात लढत असल्याचे त्यांनी सांगितले .
या दोघांपैकी कोण निवडून येणार? असा प्रश्न करताच त्यांनी कारेमोरे यांची घड्याळ सुरूच राहणार सुरूच राहणार असल्याचे सांगितले .दररोज त्यांना चार चाकी वाहनाने ने आण करणाऱ्या बेटाळा गावातील चार चाकी गाडी मालक विजय हलमारे यांनी सांगितले की, दिवाळीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत 7500 पाठविल्याने सर्व महिला मजूरवर्ग खुश झाले असून, शेतकऱ्यांना वर्षाचे 12000, पाच वर्षापर्यंत विजेचे बिल माफ ,त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग खुश झाले व घरकुलची मंजुरीची गती दहा पटीने वाढल्याने व नेत्र दीपक विकास काम केल्याने सर्व स्तरातील मतदार भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खुश असल्याने महायुती सरकार बहुमताने येणार असल्याचे विजय हलमारे व तेथे उपस्थित मोरगावचे सामान्य नागरिक रतिराम बारईसह इतरही अनेक वृद्ध , युवा तरुण-तरुणी मतदारांनी सांगितले .
धनी शिवारात देखील साकोली विधानसभा अंतर्गत येणाऱ्या गावातील धान कापणाऱ्या लाडक्या बहिणी मजूर वर्गांनी साकोली विधानसभेत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर (कमळ )विजयी होणार असून त्यांच्या विरोधातील उमेदवार महाविकास आघाडीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिग्गज नेते नाना पटोले यांच्या पंजाला यंदा बाय-बाय म्हणण्याची वेळ आल्याची लाडक्या बहिणीने सांगितले.
धान कापणी करणाऱ्या लाडक्या बहिणी मजूर वर्गांनी भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सांगितलेला एक्झिट पोल आज दिनांक 23 नोव्हेंबर शनिवारला होणाऱ्या मतमोजणी दरम्यान खरा की खोटा ?हे कळणार आहे.