नागपूर :- आज नागपूर शहरात सकाळी १०:३० वाजता नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन प्रसंगी संचालक ललित टेकचंदाणी नागपूर शहरात येताच तक्रार कर्त्यांना भनक लागताच नागपूर शहर घाटून यांचे विरोधात पत्र परिषदेत धाव घेतली.नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट एनसीआयचे संचालक ललित टेकचंदनी यांनी क्लॅन सिटीच्या रूम खरीदारांना फसविल्या गेले. सर्व मुंबई येथील रहिवाशांची फसवणूक केल्याबद्दल त्यांचे विषयी माहिती परिषदेत दिली. आम्ही सर्व क्लन सिटी पूर्वीचे Hex सिटी मध्ये आम्ही इ.सन. 2000 साली क्लॅन सिटीचे डायरेक्टर ललित टेकचंदानी, राजू कांचवाला, अरुण माखीजाणी यांच्याकडे रूम बुक केलेले होते. त्यावेळेला त्यांनी आम्हाला 2013 मध्ये पझेशन देऊ असे सांगितले. पण 2013 मध्ये रूम तयार झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये पझेशन देऊ असे त्यावेळी सांगितले. पण 2017 मध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला पझेशन दिलेले नाही त्यानंतर त्यांनी आम्हाला मार्च 2022 ला पझेशन देतो अशी आश्वासन दिले. परंतु 2022 ला सुद्धा त्यांनी आम्हाला पझेशन दिलेले नाही. आज जवळ जवळ ६ वर्षे काम बंद आहे. व ६ वर्षात जवळ पन्नास वेळा आम्ही सर्व तक्रार कर्ते त्यांच्याकडे चेंबूर येथे ऑफिसमध्ये गेलो असता तेथे कोणीही उपस्थितीत नव्हते व ऑफिस बंद झाले आहे. त्यांच्या विरोधात पोलीस कम्प्लेंट करण्यासाठी तळोजा पोलीस स्टेशन असे उच्चंभोर पोलीस स्टेशन येथे गेलो असता पोलीस स्टेशन आमची कंप्लेंट घेत नाहीत उलटे आम्हाला दमदाटी करून तेथून पाठविले. सदरच्या प्रोजेक्टमध्ये 1950 प्लॉटधारक खरेदीदार असून त्या सर्वांची लगबग 95 टक्के रक्कम त्यांनी घेतली आहे. काही फ्लॅट धारक हे मृत पावलेले आहेत. सदरच्या बिल्डरवर 182 केसेस दाखल झालेले आहेत. कंजूमर कोर्ट मध्ये तीस केसेस आहे.
तरी असला हा चीटर माणूस सत्यापक्षांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांबरोबर तसेच मोहन भागवत यांच्या सारख्या व्यक्तीसोबत एकाच मंचावर बसतो तरी याचे केवढे मोठे लागेबांधे असलेला माणूस आहे. तरी आम्हाला अशी शंका येते की, आम्ही सर्व साधारण माणसं असून आम्हाला यांच्याकडून न्याय मिळेल. अशी अपेक्षा करीत आहे. आम्हाला न्याय मिळण्यात यावा या अपेक्षेने आम्ही पत्रकार बंधूंना सांगतो आहे की, आमच्या सोबत फसवणूक झालेली आहे. दुसरेही व्यक्ती यात फसवू शकतात म्हणून आम्ही त्याच्या विरोधात पत्रपरिषद मध्ये न्यायाची मागणी करीत आहेत. यावेळी पत्रपरिषदेला योगेंद्र माहेश्वरी, दिलीप शिंदे, शंकर झाँ, हिरा जाधवानी, आर.एस. जैस्वाल, जे.मंगलांनी आणि रोमा कटॉरिया यांची मंचावर उपस्थिती होती.