संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- दिल्ली येथे माजी उप पंतप्रधान बाबु जग जीवन राम यांच्या द्वारे स्थापन करण्यात आलेल्या भारतीय दलित साहित्य अकादमीच्या नागपुर जिल्हाध्यक्षपदी दीपचंद शेंडे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल पी. सुमनाक्षर यांनी केली आहे. दलितोत्थान क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल दलित साहित्यकार आणि समाजसेवकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्काराने सन्मानित करण्याचे कार्य भारतीय दलित साहित्य अकादमी करत असते.
दीपचंद शेंडे ला विचारले असता त्यांच्या मते समाजात वर्षानुवर्षे कार्य करतानी खरे यश मिळाल्याचे मत व्यकत केले. दीपचंद शेंडेंच्या यशाबद्दल माजी आमदार सुधाकर कोहळे, निवृत्त आय ए एस किशोर गजभिये, निवृत्त आय एफ एस शिवराम भलावी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे, सतीश पेंदाम, उत्तम मस्के, मोहम्मद अली आजाद, अजय त्रिवेदी, धनंजय कापसीकर, अखिलेश मेश्राम, प्रविण सोनेकर आदींनी अभिनंदन केले.
दिपचंद शेंडे च्या शिफारशीद्वारे, नागपुर क्षेत्रातील उत्कृष्ट पत्रकार, संपादक, मीडिया रिपोर्टर, लेखक, साहित्यकर, कलावंत, शायर, कविताकार, गायक, खेळाडु, शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे संस्था किंवा व्यक्ती, रचनाकार, समाजसेवक अश्या व्यक्तींना व संस्थांना दिल्ली येथे १० – ११ डिसेंबर २०२३ ला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे, इच्छुकानी ९८३४३५३९१२ या नंबर वर दिपचंद शेंडे शी संपर्क करून अर्ज मागवु शकतात.