‘दिलखुलास’ कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांची मुलाखत

मुंबई, दि. ३ – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात औद्योगिक मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांची मुलाखत पुनःप्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            लोकआग्रहास्तव या मुलाखतीचे पुनःप्रसारण मंगळवार, दि. ४ जानेवारी, बुधवार दि. ५ जानेवारी आणि गुरुवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या अॅपवरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत करण्यात येईल.

            कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य, मानसिक आरोग्याचा व कामाच्या गुणवत्तेचा संबंध, भारतात मानसिक आरोग्याच्या बाबतीत नेमकी स्थिती, कामगारांचे मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना, आरोग्य व त्याचे प्रकार, नोकरी व व्यवसायाशी संबंधित मानसिक आरोग्य, ‘वर्क फ्रॉम होम’चा मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम, वेल बिईंग ही संकल्पना आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. राऊत यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Mon Jan 3 , 2022
नवी दिल्ली, 03  : स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या महाराष्ट्रातील अग्रणी व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन  आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.              कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई  फुले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com