मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सर ज. जी. स्कुल ऑफ आर्ट या महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
राज्यातील तसेच कलेच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत असलेले सर ज.जी स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालय ही अग्रगण्य कलाशिक्षण संस्था आहे. या क्षेत्रातही रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असतात. त्याअनुषंगाने या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया, अभ्यासक्रमाचे महाविद्यालयाचे दरवर्षी भरणारे वार्षिक कला प्रदर्शनाचे स्वरूप, तसेच कलेच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी, याबाबतची माहिती प्रा. डॉ. साबळे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातुन दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रा. डॉ. साबळे यांची मुलाखत सोमवार दि. 18, आणि मंगळवार दि.19 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 16 मार्च 2024 रोजी सायं 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पंकज चव्हाण यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR