वंजारी हॉस्पिटल ने पीडित महिलेचे गर्भपात करताना शासनाची परमिशन घेतली काय ? असा आरोप शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर

– पीडित महिलेला न्याय देण्यासाठी पत्र परिषदेमध्ये शिवसैनिक महिलांनी घेतली धाव

नागपूर :- शिवसेना कार्यालय धंतोली नागपूर येथेल प्राप्त तक्रारनुसार, पिडित मुलगी राहणार इतवारी हायस्कूल नागपूर या मुलीचे गैर अर्जदार सौरभ चौरेवार या मुलासोबत नोव्हेंबर 2019 मध्ये टेक महिंद्रा वाडी नागपूर येथे हॉस्पिटल मॅनेजमेंट चा कोर्स करताना ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले मार्च 2020 मध्ये गैर अर्जदार सौरभ सुरेश चौरेवार आय टी पार्क लोखंडे नगर नागपूर याने लग्नाचे आमिष दाखवून, कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीचे औषध देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केले, नंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले, मासिक पाळी का येत नाही म्हणून पिडीत मुलीने यादव हॉस्पिटल सी रोड येथे तपासणी केली त्यामध्ये मुलीगी सात महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले तसेच आपल्याला गर्भपात करायचे असल्यास वंजारी हॉस्पिटल भांडे प्लॉट नागपूर येथे गर्भपात करण्यास सांगितले. २१ ऑक्टोंबर २०२२ रोजी वंजारी हॉस्पिटल येथे गेले असता डॉक्टर आरती वंजारी यांनी गर्भपात करण्यास नकार दिला परंतु 50 हजार कॅश भरली तर आपण गर्भपात करून घेऊ असे सांगितले पीडित मुलीची मानसिक स्थिती ठीक नव्हती तिला बाळ हवे होते मुलीच्या मनाविरुद्ध जबरीने गैर अर्जदार सौरभ चौरेवार याने पन्नास हजार रोख रक्कम जमा करून वंजारी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल /क्रिटिकल केअर लक्ष्मी कॉम्प्लेक्स भांडे प्लॉट स्क्वेअर उमरेड रोड नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये अविवाहित पीडीत मुलीला हॉस्पिटल मधील औषधी देऊन प्रथम गर्भातल्या भ्रूणलां मुरर्शित केले, अनैसर्गिक पद्धतीने गर्भपात केला, मुलीला फाईल देताना कुठली औषधे गर्भपात करण्याच्या आधी दिल्या गेली त्याची कुठलीही माहिती नाही, या मुलीच्या गर्भात सात महिन्याचं बाळ असताना डॉक्टरने हिचा गर्भपात कसा केला?

संबंधित मुलगी ही अविवाहित असून तसेच जीवाला धोका असताना २० आठवड्यापेक्षा जास्त गर्भधारणा असलेल्या मुलीचा गर्भपात कुठल्या नियमांतर्गत करण्यात आला ? सदर हॉस्पिटल शासकीय मान्यता प्राप्त रजिस्टर आहे का ? तसेच MTP act नुसार गर्भपात करतांना संबंधित माहिती हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी शासनाला सादर करुन परवानगी घेतली का ? हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे शिवसेना महीला जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर, तसेच महीला पदाधिकारी यांनी डीसीपी अनुराग जैन यांची भेट घेऊन संबंधित पीडित मुलीचा विषय मांडून गैर अर्जदार सौरभ चौरेवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले संबंधित ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत सावंत यांनी दि.२४ जून २०२४ भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३७६ (२) (न),३१३,३१५ अंतर्गत प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई केलेली आहे, परंतु हॉस्पिटल वर आत्तापर्यंत कुठलीही कारवाई किंवा चौकशी केलेली नाही संबंधित सौरभ वंजारी हॉस्पिटल भांडे प्लॉट नागपूर यांची लवकरात लवकर चौकशी करून हॉस्पिटल सील करण्यासंबंधीत निवेदन जिल्हाधिकारी यांना निवेदन मार्फत सात दिवसात चौकशी करून संबंधित हॉस्पिटल मालक यांच्यावर नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यासंबंधी विनंती केलेली आहे. अन्यथा शिवसेनेतर्फे संबंधित वंजारी हॉस्पिटल यांच्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.

यावेळी मंचावरील उपस्थित जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर, शहर प्रमुख सचिन यादव, मंजुषा पानबुडे, मनीषा पराड, पूनम चाडगे, नयना दीक्षित, सुनिता चालखोरे, बबिता शे.चालखोरे आणि वृषाली विश्वास बाईवार ई. होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम ३० जूनला

Thu Jun 27 , 2024
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, दि. ३० जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपात (आवश्यक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!