नागपूर :- भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर यांच्या वतीने धर्मेंद्र देशमुख यांची नागपूर शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांचे नेतृत्वात धर्मेंद्र देशमुख यांची नागपूर शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
धर्मेंद्र विठ्ठलराव देशमुख हे भाजपा मध्ये 2011 पासून कार्यरत आहे. प्रभाग 18 झिंगाबाई टाकली येथील नुकतेच नवनियुक्त धर्मेंद्र देशमुख यांनी मी भाजप पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने तन-मन-धनाने योगदान करू आणि पक्षाच्या भरभराटीसाठी सर्व टीमवर्क एकत्रित आणून कार्य करणार अशी ग्वाही दिली. त्यांचे अभिनंदन करून देशमुखांनी या सन्माननीय दिग्गज नेंत्याचे आभार मानले.