नागपूर :-टायगर सिटी साइक्लिंग क्लबचे सदस्य धर्मपाल फुलझेले यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी सायकलने मनाली ते खर्दुंगला असा प्रवास अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केला. ते २०२१ मधे भारतीय जीवन विमा निगम मधून निवृत्त झाले होते.
यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने हिमालयन एडवेंचर ट्रेकिंग, बाईकिंग ई. उपक्रम घेतले जातात. यावर्षी ३० जून २०२३ पासून मनाली-लेह-खर्दुंगला या साइक्लिंग एक्सपेडिशन मधे नागपूर मधून एकमेव धर्मपाल फुलझेले यांनी सहभाग नोंदविला होता.
संपूर्ण भारतातून ८१ सायक्लिस्ट सहभागी झाले होते. त्या प्रमाणे १५ माईल बेस कैंप कुल्लू येथून साइक्लिंग ला सुरुवात होऊन मरही, सिसू व्हाया रोहतांग, जीस्पा, झिंग झिंग बार, सर्चू व्हाया बारालाचा ला, व्हिस्की नाला, डेबरिंग व्हाया लाचुंगला, रूमसे व्हाया टांगलांग ला, लेह व खरदुंग ला असा खरतड प्रवास अवघ्या दहा दिवसात पूर्ण केला. तांगलांगला पास १७४८२ फूट उंचीवर असून जगातील सर्वात उंच शिखरा पैक्की १२ व्या स्थानी आहे. कडाक्याची ठंडी, पाऊस, प्राणवायूची कमतरता अश्या कठीण परिस्थितीत स्वतःचा आत्मविश्वास व सहनशक्ती कधीच डगमगू न देता येणाऱ्या सर्व प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला.