संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
-परिसरात राममय वातावरण
कामठी ता प्र 6 – कार्तिक मासनिमित्त येथील दुर्गादेवीनगर ,हनुमान मंदिर परिसरात श्री हनुमान मंदिर देवस्थान कमिटी व काकड आरती उत्सव समितीच्या वतीने सुरु असलेल्या श्रीरामकथा सोहळा व अखंड हरिनाम साप्ताहांतर्गत ह भ प चिंदबाजी महाराज सरोदे यांच्या श्रीरामकथा प्रवचनातून भाविक मंत्रमुग्ध होऊन परिसरात राममय वातावरण निर्माण झाले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात 1 नोव्हेंबर ला झाली असून हभप चिंदबाजी महाराज सरोदे हे प्रतिदिन सकाळी व सायंकाळी रामकथा प्रवचन करीत असून दरम्यान रोज काकड आरती,श्रीराम कथा प्रवचन,हरिपाठ ,यासह अन्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर 9 नोव्हेंबर ला या अखंड हरिनाम कार्यक्रमाची सांगता होणार असून 9 नोव्हेंबर ला सकाळी 9 वाजता। श्रीरामरितमानास यांची शोभायात्रा काढून गोपाळकाला तर सायंकाळी 6 वाजता भव्य महाप्रसाद वितरण करण्यात येईल.
या भक्तिमय श्रीराम कथा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात कथा प्रवक्ता ह.भ.प.चिंदबाजी महाराज सरोदे यांच्यासह ,गायक ह,भ, प, विष्णु जी महाराज जाधव वाशिम ,गायक ह,भ,पसुमित महाराज बोधले टाकळीगायक ह ,भ ,प भूषण महाराज पोहरकर लोनी ऑर्गन वादक रवी महाराज ऊके मोदा तबला वादक आकाश महाराज कडू झाकिकार नितेश महाराज अलोने यांनी मोलाची भूमिका साकारली.
सदर कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री हनुमान मंदिर देवस्थान कमिटी तसेच काकड आरती उत्सव समिती चे काशिनाथ प्रधान,नरेंद्र सार्वे ,श्यामजी देशपांडे,मोहन मते,प्रवीण सार्वे,दिलीप पार्लेवार,नत्थु रघटाटे, राजकुमार बोंबाटे, विनोद काटकर, उमेश बोंबाटे, आदींनी केले आहे