नागपुर – अँँड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. ३ नागपूर येथे कलम १२५- अ लोकप्रतिनिधी कायदा प्रमाणे आरोपी देवेंद्र फडणवीस यांचेवर आरोप निश्चित झाले होवून ते व्यवस्थित समजल्याचे हमीपत्र फडणवीस यांनी सादर केलेवर न्यायालयात साक्ष नोंदविण्यास सुरुवात झाली आहे . निवडणूक निर्णय अधिकारी ५२ – दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघ यांना, त्यांचे कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१४ चे निवडणूकीचे वेळी नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेले प्रतिज्ञापत्र हे दस्तावेज घेवून न्यायालयात साक्षकामी दि. २३.१२.२०२१ हजर राहणे बाबत मा. JMFC कोर्ट क्र. ३ नागपूर न्यायालयाने आज दि. १५.१२.२०२१ रोजी समन्स जारी केला आहे . समन्स हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना तामिल झाला आहे .
देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रकरणात साक्ष सुरु
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com