कोदामेंढी :-मौदा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या व भंडारा सीमेलगत स्थित महालगाव येथील अनेक शेतकऱ्याच्या शेती शुर नदीपलिकड़े असल्याने व नदिकडे जाणारा रस्ता हा खड्डेमय असून पावसाळ्यात नदिला पुर असल्याने, खुप फेरा मारुन जावे लागते. या गाव शिवारात 5 पांधन रस्ते प्रत्येकी अंदाजे 2 – 2 किमी असून अनेक प्रस्ताव संबंधित विभाग व लोकप्रतिनिधि यांना देऊनही अजूनही मातिकामाचा श्रीगणेशा झालेला नाही, अशी माहिती महालगाव ग्राम पंचायत सरपंचा उषा नरेंद्र मोहतुरे यांनी दिली. महालगाव ते सितेपार या पुलियाच्या कामाला व गाव शिवारातील पांधण रस्त्याच्या मातिकामासह खड़िकरनालाही मंजूरी द्यावी अशी मागणी सरपंचा उषा मोहतुरे सह किसन मारबते, शत्रुग्न भोयर, हरिचंद चावके व गावातील समस्त शेतकऱ्यान्नी केली आहे.
दोनदा माती परिक्षण होऊनही नदिच्या पुलियाला मंजूरी नाही, तर पांधण रस्त्याच्या मातिकामाचा श्रीगणेशाही नाही – सरपंचा उषा नरेंद्र मोहतुरे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com