– मनपा आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. प्रकाश वराडे मनपा सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शुक्रवारी (ता. २८) मनपा आयुक्त सभाकक्षात वराडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी होते. त्यांनी पुष्पगुच्छ आणि मनपाचा मानाचा दुपट्टा देउन वराडे यांचा सत्कार केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, अशोक गराटे, गणेश राठोड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त सर्वश्री हरीश राऊत, घनश्याम पंधरे, प्रमोद वानखेडे, सहायक संचालक नगर रचना ऋतुराज जाधव, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, वृक्ष संवर्धक अमोल चौरपगार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा आयुक्तांनी प्रकाश वराडे यांच्या सेवाकार्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. दोन दशकापेक्षा जास्त काळ मनपाच्या विविध झोन कार्यालयांमध्ये वराडे यांनी सहायक आयुक्त म्हणून सेवा दिली. नेहमी हसतमुख राहून तणावाशिवाय कार्य करण्याची त्यांची शैली वैशिष्ट्यपूर्ण होती, असे गौरवोद्गार डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी काढले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना उपायुक्त प्रकाश वराडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. लडाखमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन आणि मुंबईमध्ये सिडको येथे सेवाकार्य केल्यानंतर २००४ ला नागपूर महानगरपालिकेमध्ये सहायक आयुक्त म्हणून रुजू झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनपाच्या सभागृहात प्रश्नांच्या उत्तरासाठी उभे रहावे लागल्याचा गंमतीदार किस्सा देखील त्यांनी यावेळी सांगितला.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व शेवटी त्यांनी आभार देखील मानले. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्र राठोड, श्रीकांत वाईकर, उपअभियंता राजेश गुरमुळे, सहायक विधी अधिकारी अजय माटे, सुरज पारोचे, आनंद शेंडे आदी उपस्थित होते. यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाद्वारे देखील उपायुक्त प्रकाश वराडे यांचा सत्कार करण्यात आला.
मनपाचे १५ कर्मचारी सेवानिवृत्त
शुक्रवारी २८ मार्च रोजी उपायुक्त प्रकाश वराडे यांच्यासह नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत १५ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहायक आयुक्त श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, तुळशी रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. आरिफा अली यांच्यासह शिक्षण विभागातील मुख्याध्यापक (माध्यमिक), नितीन भोळे, सहायक शिक्षक वैशाली रागोटे, संजय म्हाला, सुनिता निबूधे, पुरुषोत्तम कळमकर, उमेश पवार, नुतन चोपडे, सिंधु मेश्राम, अनिता खरे, खाजिस्ता कौसर इनामुर र.सिद्यीकी, जलप्रदाय विभागातील वायरमन अरविंद तभाने, समिती विभागातील मो.नसीम खान, कर व कर आकारणी विभागातील प्रकाश पेंदाम, सामान्य प्रशासन विभागातील अजय कांबळे, घनकचरा व्यवस्थापन विभागातील उमेश गोखले या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मनपाच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.