मुंबई :- राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. या भागातील शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार शासन मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.