तरूण उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला अतुल बेडेकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई :-  व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील तरूण मराठी उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, बेडेकर हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस दुर्मिळ. त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला कार्पोरट करतानाच त्यातील चव मात्र अस्सल मराठी ठेवली होती. बेडेकर ब्रँड उभा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांसोबतच सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये बेडेकर नाव पोहोचले आहे. त्याचे श्रेय अतुलजींना जाते. त्यांच्या निधनाने एक ध्येयनिष्ठ उद्योजक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बरीएम तर्फे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

Fri Nov 3 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 67 व्या धम्मक्रांती दिनानिमित्त यावर्षी दीक्षाभूमी नागपूर च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी शहरातील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे गौतम बुद्ध व आंबेडकर भवन परिसर येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नतमस्तक होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखोंच्या संख्येत अनुयायी दोन दिवसांपूर्वी पासूनच जमले होते या अनुयायांची सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी व कायदा व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!