उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

31 जानेवारी 2023 ची मंत्रिमंडळ बैठक आटोपल्यानंतर एक दिव्यांग आजी मला भेटल्या. पेन्शन मिळत नाही, एवढेच त्यांनी सांगितले. पेन्शन कशाची हेही ठावूक नव्हते. सोबत दृष्टीबाधित आजोबाही होते. त्यांच्या खिशात फोन होता. पण, नंबरही सांगता येत नव्हता.

साहेब, आजच्या आज मला पेन्शन मिळालीच पाहिजे, असा आजींचा आग्रह आजोबा मोठ्या अभिमानाने सांगत होते, आजी आजवर अनेक मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना भेटल्या. पण, काम कुणी करीत नाही. 10 मिनिटांच्या संवादानंतर सुदैवाने त्यांचा अर्ज मिळाला.

सुनीता आष्टुक असे त्यांचे नाव. रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे!

मी, तो अर्ज पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना पाठविला आणि त्यांनी तत्काळ उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत कार्यवाही केली. त्यांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र आज देण्यात आले.

मला आनंद आहे की, या वृद्ध दिव्यांग दाम्पत्याची सेवा मला करता आली. शेवटच्या माणसाचा विकास हेच ध्येय ठेऊन राजकारणात काम करायचे असते. सर्व अधिकार्‍यांचेही अभिनंदन!

आजी-आजोबांना त्यांच्या भावी जीवनासाठी अनेक उत्तम शुभेच्छा. त्यांना निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो…

#Pune humanity

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

VARIOUS IPC SECTIONS Slapped on NVCC staff bearers,finally FIR is lodged

Fri Feb 24 , 2023
Nagpur :- The Economic Offence Wing (EOW), Nagpur after conducting preliminary enquiry (pre FIR investigation) for more than a year taking serious cognizance of commission of offences of cheating, fraud, misrepresentation, misappropriation, breach of trust, forgery, concealment of material facts, causing loss to the Chamber and its members and unlawfully earning for themselves, has registered FIR against Ashwin Prakash Agrawal […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com