उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागपूर येथे कार्यालय कार्यान्वित

*विदर्भातील नागरिकांच्या सुविधेसाठी नागपूर येथे*

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नवीन कार्यालय*

*विदर्भातील नागरिकांच्या कामांचा पाठपुरावा होणार*

 * विदर्भवासियांची मुंबईवारी टाळण्यासाठी कार्यालय

नागपुर :- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नागपूर विभागीय कार्यालय ‘विजयगड बंगला, जिल्हा परिषदेसमोर, रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गातील उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून सचिन यादव हे जबाबदारी सांभाळणार आहेत.

नागपूर, अमरावती विभागातील नागरिकांची, सामाजिक संस्था, संघटनांची कामे स्थानिक स्तरावरंच मार्गी लागावीत, मुंबईपर्यंत येण्याचे त्यांचे कष्ट थांबावेत या उद्देशाने, अजित पवार यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय कार्यालय सुरु केले आहे. नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याबरोबरंच, मंत्रालयाशी संबंधीत त्यांची कामे तसेच कामांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे. विदर्भातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याशी संबंधित कामांसाठी नागपूर विभागीय कार्यालयात किंवा उपमुख्यमंत्र्यांचे (वित्त व नियोजन) विशेष कार्य अधिकारी सचिन यादव यांच्याशी 9421209136 वर संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि.10 जानेवारी 2024 एकूण निर्णय-9

Wed Jan 10 , 2024
महिला व बालविकास विभाग राज्यातील नागरी भागात आता बाल विकास केंद्र कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागामध्ये ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात ग्रामीण भागामधील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांच्या कुपोषणावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com