उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे यांचा आज नागपूर दौरा

नागपूर, दि. ११: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे या उद्या शनिवार, दि. १२ मार्च‌ रोजी नागपूर दौ-यावर येत आहेत.

नीलमताई गो-हे यांचे सकाळी साडेआठ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी सव्वाअकरा वाजेपर्यंत राखीव. सकाळी सव्वाअकरा वाजता एनबीएसएस सभागृह, अमरावती रोड येथे आयोजित विदर्भ स्तरीय सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभाव्दारे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची यंत्रणा म्हणून वने व जलआधारित शाश्वत उपजीविका निर्मिती व शासन निर्णयाची अंमलबजावणी संदर्भात कार्यक्रमास उपस्थिती. यानंतर कार्यक्रमस्थळी त्यांची पत्रकार परिषद होईल.
त्यानंतर दुपारी चार वाजता रविभवन येथे विविध संघटना व सामाजिक संस्था यांच्यासमवेत बैठक होईल. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक लिलाताई चितळे यांची सदिच्छा भेट तसेच गणेश टेकडी येथील दर्शन व रात्री ९:२५ वाजता विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रियकर व प्रेमिकेची हातात हात घालून रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या

Sat Mar 12 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 12:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक रहिवासी एक 18 वर्षीय तरुण व 16 वर्षीय तरुणीने प्रेमप्रकरणातून दोन दिवसांपूर्वी घराबाहेर पडून काल रात्री 8 च्या जवळपास कन्हान रेल्वे पुलियाजवळील 100 मीटर दूर अंतरावरील कामठी रेल्वे ट्रॅकवर दोन्ही प्रेमी जोडप्यानी हातात हात घालून हावडा अहमदाबाद धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!