नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहीती मिळाली की धम्मदिप बुध्द विहारा जवळ, सार्वजनीक रोडवर हद्दपार ईसम नामे अनिकेत उर्फ अन्नू काल्या हा फिरत आहे. अशा माहितीवरून नमुद ठिकाणी जावुन पाहणी केली असता तेथे आरोपी नामे अनिकेत उर्फ अन्नू काल्या जगदीश बडोदे, वय २४ वर्ष, रा. नंदनवन झोपडपट्टी, नागपूर हा दिसल्याने तो पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचे तयारीत असतांना त्यास ताब्यात घेतले. त्याचे वावत अभिलेख तपासला असता त्यास मा. पोलीस उप आयुक्त परि क. ४ यांचे हद्दपार आदेश क. ४/२३ दिनांक, १५,०६,२०२३ पासुन नागपूर शहरातुन दोन वर्षा करीता हद्दपार केल्याचे दिसुन आले. आरोपीविरूष्ट कलम १४२ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.