नागपूर : विभागीय आयुक्त कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी शैलेंद्र मेश्राम यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (पुनर्वसन) रश्मी माळी, तहसीलदार अरविंद शेलोकार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.