संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20:-राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी 16 मे हा दिवस ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’म्हणून साजरा करण्यात येतो तर डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एजिपटाय नावाच्या डासांमुळे होतो सदर डासांची उत्पत्ती ही साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी हे आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवू नये याची सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ धीरज चोखांद्रे यांनी आज शासकोय उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे आयोजित राष्ट्रीय डेंग्यू दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच डेंग्यू बाबत माहिती तसेच इतर कीटकजन्य आजाराबाबतसुद्धा माहिती देण्यात आली . याप्रसंगी डॉक्टर नफिसा मॅडम भोयर , सावते , धावडे आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर तसेच लोकसहभाग उपस्थित होते .
डेंग्यूचा प्रसार हा एजीपटाय नावाच्या डासांमुळे -डॉ चोखांद्रे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com