– “ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक व शेतकरी प्रशिक्षण”
हिंगणा :-मोहगाव झिल्पी ता. हिंगणा, जिल्हा नागपूर येथे दिनांक 3/11/2023 ला सिटी सीडीआरए कॉन्फेडरेशन ऑफ इंडीयन टेक्स्टाइल इंडस्ट्रीज कॉटन डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशन मार्फत सीआयसीआर चे माध्यमाने कापुस पिकावर शेतकरी प्रशिक्षण व ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजीत करण्यात आले. मिलींद शेंडे विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे डी ए नागपूर, डॉ.मनिकंदन, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ.शिवाजी ठूबे वरिष्ठ शास्त्रज्ञ, सुबोध मोहरील उपसंचालक, वनामती नागपूर दिपाली कुंभार, तालुका कृषी अधिकारी हिंगणा, गोविंद वैराळे प्रकल्प समन्वयक सिटी सीडीआरए, फलके प्रगतीशील शेतकरी, जगदीश नेरलवार प्रकल्प अधिकारी सिटी सीडीआरए यांनी मार्गदर्शन केले. मिलींद शेंडे, विजिअकृअ. नागपूर यांनी अतिघन कापुस लागवड पद्धतीने उत्पादन कसे वाढविता येईल, वानाची निवड, स्वच्छ कापूस वेचणी तंत्रज्ञान या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमती दिपाली कुंभार, ताकृअ. हिंगणा यांनी ड्रोन खरेदी साठी अर्ज कसे करावे, ड्रोन खरेदी साठी असलेल्या अनुदाना बद्दल व डिपीसी अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी/ संस्था/ गट यांना किसान ड्रोन स्प्रेपिंग उपकरण 90% अनुदानावर उपलब्ध आहे याबद्दल माहिती दिली. डॉ. मनिकंदन व डॉ. शिवाजी थुबे सीआयसीआर नागपूर यांनी कापूस पिकावर विस्तृत मार्गदर्शन केले आणि ड्रोन चे सहाय्याने फवारणीचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष कपाशीचे शेतावर सर्व प्रशिक्षणार्थीचे समक्ष करून दाखविले. गोविंद वैराळे, प्रकल्प समन्वयक सिटी सीडीआरए यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जगदीश नेरलवार प्रकल्प अधिकारी यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले.
सदर प्रशिक्षणाला नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या चार जिल्ह्यातील आठ क्लस्टर (तालुके) मधील शेतकरी व स्काऊट उपस्थित होते.