नागपूर :-नागपूर महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालयात मंगळवार २ मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. परंतु, सोमवार १ मे, २०२३ महाराष्ट्र दिनाची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंगळवार २. मे रोजी सकाळी १०.०० वा. सिव्हील लाईन्स येथील केंद्रीय कार्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात (स्थायी समिती सभागृह) येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आले आहे. लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मनपात २ मे रोजी लोकशाही दिन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com