मनपात ५ जून रोजी ‘लोकशाही दिन’

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालयात सोमवार ५ जून २०२३ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून दुपारी १२. ०० वाजेपर्यंत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृह (स्थायी समिती सभागृह) सिव्हील लाईन्स, नागपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदारांनी मतदान यादीमध्ये नाव नोंदवावे, मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरु

Fri Jun 2 , 2023
नागपूर :- भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला असून नोंदणीसाठी पात्र असलेल्या मतदारांनी मतदान यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून दिनांक १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com