मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या सुरू ठेवा व चैत्यभूमी साठी अतिरिक्त गाड्या सोडा, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे बसपाची मागणी

नागपूर :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करणाऱ्या लाखो अनुयायांना थांबवण्यासाठी, तसेच मागील अनेक वर्षापासून कासव गतीने सुरू असलेल्या इंदू मिलच्या जागेवरील डॉक्टर आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाचे बींग फुटू नये या भीतीपोटी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रेल मंत्रालयाने 3 डिसेंबर ते 6 डिसेंबरच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या 22 गाड्या रद्द केल्या.

मुंबई ला जाणाऱ्या नियमित रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू ठेवून पुन्हा अतिरिक्त गाड्या सोडाव्या या प्रमुख मागणीसाठी आज नागपूर जिल्हा बसपाचे अध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वात मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक पी एस खैरकर यांच्या माध्यमातून केंद्रीय रेलमंत्री अश्विनी वैष्णव व मुंबईचे महाप्रबंधक (जी एम) अनिल कुमार लाहोटी यांच्या नावे निवेदन दिले.

बसपा ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 3 डिसेंबर ते 6 डिसेंबरच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या व 6 ते 9 डिसेंबरला मुंबईवरून परतणाऱ्या सर्व रेल गाड्या जैसे थे सुरू ठेवाव्या. मागील 2 वर्षापासून कोविडच्या भीतीपोटी शासनाने चैत्यभूमी वर जाण्यास बंदी घातली होती. त्यामुळे यावर्षी लाखो आंबेडकरी अनुयाई उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रेल्वेला यापासून नेहमीसारखा करोडो रुपयांचा आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतो.

त्याकरिता मुंबईला जाणाऱ्या अतिरिक्त गाड्यांची व कोचची सुद्धा व्यवस्था करावी. अश्या प्रकारची मागणी सुद्धा बसपाने आपल्या निवेदनात नमूद केलेली आहे. अत्यावश्यक असल्यास रिमॉडेलिंग किंवा नॉन इंटरलॉकिंग चे काम 10 ते 13 डिसेंबरच्या दरम्यान करावे. अशी सूचना सुद्धा बसपा ने आपल्या निवेदनात केली.

निवेदन देताना मध्य नागपूर विधानसभा बसपाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी शहराध्यक्ष महेश सहारे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, जिल्हा सचिव ताराचंद गोडबोले, आर्वी वर्धाचे सचिव लक्ष्मण वाळके, पश्चिमचे माजी अध्यक्ष सदानंद जामगडे, उत्तर नागपूरचे माजी प्रभारी गौतम गेडाम, विद्यार्थी नेते अंकित थुल, खापरखेडाचे लीलाधर मेश्राम आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महालातील मनपाचे बुधवार बाजार खाली करण्याची कारवाई , ३५६ दुकाने हटविली : नऊ मजली वाणिज्यिक संकुल बनणार

Fri Nov 25 , 2022
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मालकीचे महाल येथील बुधवार बाजाराच्या जागेवर असलेल्या ३५६ परवानाधारकांवर कारवाई करीत त्यांचे दुकाने/ओटे/जागा रिकामी करण्यात आली आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता.२५) उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, उपायुक्त (बाजार) रवींद्र भलावे आणि उपायुक्त (अतिक्रमण) अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त गणेश राठोड, बाजार अधीक्षक प्रमोद वानखेडे, सहायक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com