– गोंडवाना गणतंत्र पार्टीचा आंदोलनाचा इशारा
1) जिल्हाधिकारी यांना दिनांक 7 मार्च 2024 रोजी निवेदन दिले. जावक क्र.58
2) 7 जून 2024 रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.
3) 07 जून 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद नागपूर यांना निवेदन दिले.
4) 11 जुलै 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभाग नागपूर ग्रामीण यांना निवेदन दिले.
5) प्रति उत्तर मिळाले जा क्र : 303/2024 अजनी वाहतूक परिमंडळ नागपूर शहर मार्फत दिनांक 5 एप्रील 2024 रोजी यांनी सर्वाना पत्र व्यवहार केला.
गोंडवाना गणतंत्र पार्टी ने भरपूर निवेदन दिले परंतु अजून सुद्धा नो एन्ट्री बोर्ड व हाईट बॅरिकेट लावले नाही. त्यामुळे खापरी ते पांजरी या मार्गाने जड वाहन मोठया प्रमाणात येणे जाणे करतात कारण (टोल टॅक्स) रस्ता वाहन कर वाचवण्यासाठी गावातून जातात त्यामुळे गावातील समस्त नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागतो. अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे आणि मंदिर व शाळा रस्त्याच्या कडेलाच आहे. त्यामुळे लहान मुलं रस्त्यावर फिरत असतात अश्या सर्व समस्यांमुळे सर्व गावकऱ्यांची एकच मागणी आहे की, गावातून जड वाहनाना प्रवेश बंद करावे. परंतु अजून पर्यंत हाईट बॅरियर, नो एन्ट्री फलक लावण्यात आले नाही कारण प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे दिसून येते, तरी आपण लवकरात लवकर तडजोड करण्यात यावे. जड वाहणाचा प्रवेश 15 दिवसात बंद नाही झाला आणि एखादा अपघात झाला तर समस्त गावकरी व गोंडवाना गणतंत्र पार्टी रस्ता रोको आंदोलन करेल गाड्या जाळेल तर याला प्रशासन जवाबदार राहील. असे राजेश ईरपा यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.