जुन्या नगर परिषद कार्यालयात पटवारी व महसुल विभाग कार्यालय स्थानांतरित करण्याची मागणी..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

सामाजिक कार्यकर्त्यांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन..

कन्हान : – कन्हान येथील महसुल विभागाचे (आर .आय, रेव्हेन्यू इन्स्पेक्टर,तलाठी) कार्यालय जुन्या नगर परिषद कार्यालयात/इमारत मध्ये कायमस्वरुपी स्थानांतरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी रविंद्र राऊत यांची भेट घेऊन या ज्वलंत विषयावर सकारात्मक चर्चा करुन आणि या संदर्भात लेखी निवेदन पत्र देऊन मागणी करण्यात आली .

 

कन्हान – पिपरी नगर परिषद अंतर्गत मागील कित्येक वर्षापासुन महसूल विभागाचे आर.आय (रेव्हेन्यू इन्स्पेक्टर) व तलाठी विभाग कार्यालय हे भाडेने व लहान खोलीत किरायाचा जागेत सुरु आहे . या दोन्ही कार्यालयात विद्यार्थी शैक्षणिक कामा करिता , जेष्ठ नागरिक,वयस्कर लोक निराधार ,श्रावणबाळ योजना साठी , महिला पुरुष व इतर दैनंदिन कामा करिता शैकडो नागरिकांना या कार्यालयाचा पत्ता माहिती नसल्याने इकडे तिकडे भटकावे लागते. कधी पटवारी जागे वर राहत नाही किंवा कोतवाल भेटत नाही. या कारणास्त त्यांचे शासकीय , निमशासकीय,शैक्षणिक , इतर कामाकरिता शासकीय योजनेसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक त्रास, व मानसिक सहन करावा लागत आहे . कन्हान – पिपरी नगरपरिषद नवीन इमारती मध्ये काही प्रमाणात सर्व विभाग व इतर काम नवीन इमारत सुरू झाले आहेत . काही दिवसा नंतर जुनी नगर परिषद कार्यालय या इमारतीत धुळीने,अस्वच्छता व खनंडर होऊन न देता किंवा या इमारतीत दारु आणि असमाजिक तत्वांचा ठिया होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे जुन्या नगर परिषद इमारती मध्ये नागरिकांच्या सोय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोणातुन सामाजिक कार्यकर्ते सतीश भसारकर , प्रशांत मसार यांचा नेतृत्वात शिष्ठमंडळाने नप मुख्याधिकारी रविंद्र राऊत यांची भेट घेऊन ज्वलंत विषयावर चर्चा नगर परिषद उपाध्यक्ष योगेश रंगारी यांनी चर्चा करून सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन तात्काळ महसुल विभाग (आर. आय, तलाठी) कार्यालय जुन्या नगर परिषद कार्यालयात इमारत मध्ये कायमस्वरुपी स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे . याने लोकांना योग्य सोय,रस्त्यावर असल्यामुळे जाण्या येण्यास उपयुक्त होईल,तसेच पटवारी व आर.आय अधिकारी सहज पने लोकांना भेटतील .लोकांची मागणी लक्ष्यात घेता प्रतीलिपी म्हणून उपविभागीय अधिकारी रामटेक,तसेच तहसीलदार पारशिवनी यांना सुद्धा हा निवेदन देण्यात येणार आहे. मुख्याधिकारी यांनी लोकांच्या भावना समजत या जनतेचा हिताचे योग्य ते निर्णय घेतील असे आश्वासन मुख्याधिकारी तर्फे देण्यात आले.

या प्रसंगी ऋषभ बावनकर , दिपक तिवाडे , दिपक कुंभारे, शरद वाटकर , शक्ती पात्रे , कुंदन रामगुंडे ,अशोक मेश्राम, शेषराव बावणे,सुरेश खेरगडे सह आदि नागरिक उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चवदार तळ्याचे आंदोलन व्यवस्था मुक्तीचा प्रारंभ  : रणजित मेश्राम..

Thu Mar 21 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी – महाड तळ्याचे आंदोलन ही केवळ घटना वा कृती नसून बाबासाहेबांनी केलेल्या व्यवस्था मुक्तीचा प्रारंभ असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी भाष्यकार प्रा रणजित मेश्राम यांनी इथे व्यक्त केले. ते, २० मार्च २४ रोजी, आंबेडकर विचारधारा अध्यासन व विचारधारा विभाग आयोजित व्याख्यानात बोलत होते. ‘महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन : आजची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com