संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र – नगरपरिषद कामठी प्रभाग 16 मध्ये येणाऱ्या कामठी शहरातील एकमेव मातोश्री रमाई पुतळा परिसराचे सौंदर्यकरणाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी कामठी नगर परिषद चे प्रशासक उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
तीन वर्षांपूर्वी नगर परिषद च्या विशेष सभेत या बाबत प्रस्ताव मंजूर झाला असून अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता सह निविदा देखील काढण्यात आली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने बारा लाख रुपयांचा निधी मातोश्री रमाई पुतळा परिसर सौंदर्यकरण करण्यासाठी मंजूर झाला असून नगरपरिषद प्रशासन या कामासाठी चालढकल करीत आहे पोरवाल महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विस्तीर्ण जागेवर मातोश्री रमाई पुतळा असून सुरक्षा भिंत आणि सौंदर्यीकरण या कामासाठी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सौंदर्यकरणाचे काम आठ दिवसात सुरू न झाल्यास कामठी नगरपरिषद प्रशासना विरोधात उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.