निलज येथील निवडणुक आरक्षण प्रक्रिया निष्प क्ष करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण पदाधिका-यांचे तहसिलदारांना निवेदन.

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील निलज ग्राम पंचा यत येथील निवडणुक आरक्षण प्रक्रिया निष्पक्ष रित्या करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करिता राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण पदाधि का-यांनी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतुत्वात तहसिलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करून निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्राम पंचायत निलज ची एकुण मतदान संख्या १५३८ आहे. सदर वोटिंग संख्येत एन टी वर्गाचे मतदा न ७०० नागरिकांच्या घरात आहे. अनुसूचित जाती चे ३१ व अनुसूचित जमाती ३२ वोटिंग धारक आहे. वोटिं ग अल्प प्रमाणात असला तरी त्याचा कुटुंब १०० च्या घरात आहे. ज्यामुळे प्रशासनाने अशा घटकांना गृहीत धरून आरक्षण काढणे अनिवार्य आहे. मात्र येथे अनु सूचित जाती व अनुसुचित जमातीच्या लोकांना समजु न आरक्षण काढण्यात आले आहे. ज्यात ग्राम पंचायत सदस्यचे ९ सदस्य सर्वसाधारण आरक्षित व त्यातुनच ५ महिला सर्वसाधारण वर्गातुन आरक्षित करण्यात आ ल्याने अल्प संख्यात जातीच्या घटकांकडे दुर्लक्ष जाणी वपुर्वक करण्यात आले आहे. ग्राम पंचायत अस्तित्वात आल्यापासुन स्वराज्य पंथ संस्था अस्तित्वात आल्या पासुन येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती साठी आरक्षण सोडण्यात आले नाही. तर या अगोदर आरक्ष ण सोडत मध्ये अधिकाऱ्यांनी जनतेतुन सरपंच निवड णुक च्या शासनाच्या आदेशानुसार येथे अनुसूचित जा तीसाठी सरपंच पद प्रक्रिये नुसार आरक्षित केले होते. मात्र तिथे ही जाणीवपुर्वक षडयंत्र करण्यात आले. सदर प्रकार हा अतिशय निंदनीय असला तरी या माग चे कारण काय ? तरी समोर होणाऱ्या निवडणुकीत आरक्षण प्रक्रिया द्वेष भावनेतुन न करता निष्पक्ष रित्या करण्यात यावी. संविधानात तरतुदी प्रमाणे रोस्टर पद्ध तीने सर्व दुर्बळ घटकांचा राजकीय विकास व्हावा. कायद्यात तरतुद असतांना हेतुपरस्पर डावलणे जातीय विषमता वाढवण्याची प्रमुख भुमिका प्रशासन व निव डणूक अधिकारीच घेत आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्य चुनाव अधिकारी यांना ही या बाबद माहिती दिली आहे. ज्या निर्णय अधिकारी ने हेतुपरस्पर सदर षडयंत्र केले त्यावर अँट्रोसिटी चा गुन्हा दाखल करून तत्काळ भुलक्षी प्रवाहाने निलंबित करण्यात यावे व समोर होऊ घातलेल्या निवडणुकी मध्ये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती च्या प्रवर्गातून आरक्षण काढण्यात यावे. जेणे करून समाजात एकता बंधुता चे प्रतिक जिवंत राहतील अन्यथा जातीय दंगल होणा र त्या मागचे सुत्रधार प्रशासकीय अधिकारीच असेल याची दक्षता घ्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण पदाधि का-यांनी जिल्हा उपाध्यक्ष चंन्द्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात तहसिलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करून निवेदन देऊन केली आहे. याप्रसंगी रविंद्र दुपारे , विठ्ठल वाघधरे, सतपाल चकोले, सुनिल डोंगरे, सचिन दुपारे, रोहित मानवटकर, क्रिष्णा शेंदुरकर, अशोक मुंगाटे, मुरलीधर गोलछेडवार , गंगाधर डोंगरे, अमोल दुपारे सह पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नायब तहसीलदार ऊके यांच्या सेवनिवृत्तीपर भावपूर्ण निरोप

Fri Jul 1 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 1:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असा समाज निर्माण करण्यासाठी सर्वानी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या मूलमंत्राचा वापर करून जीवन व्यतित करणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार अक्षय पोयाम यांनी कामठी तहसील कार्यालयात आयोजित निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. ते नायब तहसीलदार आर ऊके यांच्या सेवानिवृत्तपर निरोप कार्यक्रमात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!