अमरदिप बडगे, प्रतिनिधी
ठाणेगाव येथील लाभार्थीने गोठा बांधकाम केलेच नाही.
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथे एका लाभाथ्याला शासनाच्या वतीने पशुधनासाठी गोठा देण्यात आलेला पण गोठ्याचे बांधकामच न केल्याने गावातील ग्राम पंचायत सदस्य चारुशीला कनोजे यांनी आरोप केला आहे.
या गावातील गोठा लाभार्थी उपसरपंच पुष्पा माणीक खोब्रागडे याच्या पती माणीक खोब्रागडे यांना सन २०२१ -२०२२ वर्षात गोठा महाराष्ट्र राज्य ग्रामीण हमी योजना अंतर्गत मंजूर करण्यात आला.त्याला २६ आगष्टला २०२१ ला मंजुरी देण्यात आली .७४ हजार १५९ रुपयांची अंदाजे रक्कम मंजूर करण्यात आली.१६ मार्च२०२२ बांधकाम सुरू करून २४ मार्च २०२२ गोठा बांधकाम पूर्णपणे ८ दिवसात दाखवले.
याबाबद चारुशीला कनोजे गाम पंचायत सदस्य यांनी पंचायत समिति तिरोडा खंडविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार केली होती.सदर गोठा बांधकाम प्रकरणी निधी अफरातफर झाल्याचे आरोप कनोजे सदस्य यांनी केला आहे.गोठा बांधकाम पाहण्यासाठी करिता पंचायत समिती चमू गेली असता सदर लाभार्थी गोठा दिसून आलेला नाही . संबंधित अभियंता दुशान इंगळे यांला प्रकरणाची माहिती विचारले असता त्यांनी कमेरा समोर बोलण्याचे टाळले.संबधीत लाभार्थीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.