नागपूर : यमराज खुश हुआ ! शहरातील शंकर नगर चौकात यमराजाच्या वेशात एक व्यक्ती हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांशी बोलताना दिसला
रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने “हार या हेल्मेट” ही जनजागृती मोहीम राबवली. हेल्मेट घालणे आणि रस्ता सुरक्षेतील त्याचे महत्त्व यावर या मोहिमेचा भर होता.
शंकर नगर चौकात हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या प्रवाशांना हेल्मेट किंवा हार निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यांना हेल्मेट घालण्याबद्दल आणि स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करण्याबद्दल त्यांना शिक्षित करण्यात आले आणि त्याची आठवण करून देण्यात आली. जशी जशी प्रवासाची साधने सहज उपलब्ध होत आहेत, तशी रस्त्यांवरील वाहतूक गर्दी अधिक होत आहे . रस्त्यावरील अपघात ही देशातील सर्वात गंभीर सामाजिक समस्यांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालण्याचा संदेश देणे हि या उपक्रमामागील संकल्पना होती.
या मोहिमेंतर्गत सर्व सुरक्षा नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांना “रस्ता सुरक्षा नायक “म्हणून मानले गेले .
शहर वाहतूक पोलीस या उपक्रमाशी निगडित असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले.अमित डोलस पी.आय(वाहतूक),नागपूर म्हणाले “आम्ही केवळ हेल्मेट घालण्याबाबतच नव्हे तर रस्त्यावर आल्यानंतर वाहतुकीचे सर्व नियम पाळण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहोत. या उपक्रमामुळे आमच्या कार्यात नवीन भर पडेल”.“या उपक्रमामुळे लोकांना हेल्मेट घालण्याच्या महत्त्वाविषयी शिक्षित करणे देखील सुनिश्चित होते कारण दुचाकी वाहने अपघातास सर्वाधिक असुरक्षित असतात. वाहतुकीचे नियम पाळणे हे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे, या वस्तुस्थितीबद्दल आम्ही लोकांना शिक्षित करण्याचे काम करत आहोत,” हा उपक्रम सारंग आवाड पोलीस उपायुक्त (वाहतूक), नागपूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली पार पडला.
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे चे सेंटर हेड श्री अभिनंदन दस्तेनवार म्हणाले “आम्ही विविध सामाजिक कारणांसाठी जनजागृती करण्याचे काम करत आहोत आणि हा असा उपक्रम आहे ज्याद्वारे लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्याचे आवाहन केले जात आहे.”