दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 22 डिसेंबरला

नागपूर :- बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी सोबतच उद्योजकांना योग्य व कुशल मनुष्यबळ प्राप्तीसाठी दिनांक 22 डिसेंबरला सकाळी 1 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील दिक्षांत सभागृहात कौशलय विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पडींत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील इच्छुक बेरोजगार युवकांनी मेळाव्यात उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा.

मेळाव्यात नागपूर विभाग व विभागाबाहेरील मोठ्या कंपन्याचा सहभाग राहणार आहे. या कंपन्यांमध्ये आय. टी. आय., बँकींग, सेल्स एक्जेक्युट्युव, ग्रज्युऐट/अंडरग्रज्युऐट, बारहवीं पास/नापास यांच्यासाठी विविध प्रकारची पदे भरावयाची आहेत. या रोजगार मेळावासाठी 1500 रिक्त पदांसाठी कंपन्यानी सहभाग नोंदविला आहे. तसेच नागपूर विभागातील ईच्छुक युवक-युवतींनी विभागाच्या www.rojgar. mahaswayam.gov.in संकेतस्थळास भेट देऊन मेळावासाठी नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, नागपूर कार्यालयाच्या 0712-2565479 या दुरध्वनी क्रमाकावर ज्योती वासुरकर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उप आयुक्त प्र. वि. देशमाने यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मागण्या पूर्ण होईपर्यंत आदिम हलबा,हलबी जमातीचे आंदोलन सुरु राहील

Wed Dec 20 , 2023
नागपूर :- आदिम हलबांच्या जुन्या अभिलेख्यात कोष्टी ( विणकरी ) व्यवसायाची नोंद असल्याने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे घटना दुरुस्तीची त्वरित शिफारस करावी,यासह अन्य मागण्यासाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने आदिम हलबांचा आक्रोश दाखविण्यासाठी गोळीबार चौकात अभय धकाते यांचे आमरण उपोषण दि. १० डिसेंबर पासून सुरु होते. मोर्चाच्या शिष्टमंडळाने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतांना १० दिवसापासून गोळीबार चौकात सुरु असलेले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!