नागपूर :- सहरातील नवोदित गायक यंग प्ले बॅक सिंगर यश अशोक कोल्हटकर यांना 2023चा प्राइड ऑफ सेंट्रल इंडिया अवॉर्ड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नागपुरातील हॉटेल स्व्यग स्टे येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात गायन क्षेत्रात आपल्या सुमधुर आवाजाने सिने संगीत गीत व गझल गायना द्वारे श्रोत्यांच्या मनात जागा निर्माण केल्या बद्दल उपरोक्त पुरस्कार श्रीमंत राजे मुधोजिराव भोसले यांचे शुभ हस्ते नवोदित गायक यश अशोक कोल्हटकर यांचा प्राइड ऑफ सेंट्रल इंडिया पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य आयोजिका आणि “व्हि क्विन वुमेन्स क्लब” च्या संचालिका सना खान उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून टी व्ही कलाकार वेंकटेश्वर गुमालवार, डॉ सीमा छाजेड,गायक इफतखा रजा,पत्रकार ज्योती त्रिवेदी, आदी मान्यवर उपस्थित होते.
यश अशोक कोल्हटकर गायणा सोबतच सात प्रकारचे संगीत वादन वाजवतो आणि संगीत नियोजन सुध्दा करतो त्यांनी स्वतःचे नागपुरात म्युझिक रेकॉर्डिग स्टुडिओ सुध्दा तयार केले आहे त्यांनीं बाल पण आणि विद्यार्थी दसेपासून प्राथमिक संगीताचे धडे पंडित सुरमनी प्रभाकर धाकडे यांचे कडून घेतले नंतर सिने आणि क्लासिकल,गझल गायनाचे धडे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार एम ए कादर,यांचे कडून घेत आहे तो नागपूर चे व्हीं एन आय टी रिजनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज मधून बी टेक सिव्हिल उत्तीर्ण असून याच कॉलेज मधून तो एम टेक चा विद्यार्थी आहे तो नागपूर महानगर पालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांचा मुलगा आहे.