डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने

– कृतीशील लेखक व संवेदनशील कार्यकर्ता हरपला– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 मुंबई, दि. 28 : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतीशील लेखक व संवेदनशील कार्यकर्ता हरपला, अशा शोकभावना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त करुन डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहिली.

             डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाल्याचे कळल्यावर अतीव दुःख झाले. त्यांचा आणि माझा जवळ जवळ पाच दशकांचा परिचय होता. सामाजिक चळवळीच्या निमित्ताने व युवक क्रांती दलाचे काम करत असताना अनेक शिबीरांमध्ये डॉ. अवचट यांच्या मार्गदर्शनपर विचारांचा फायदा झाला. अत्यंत संवेदनशील मनाबरोबरच कृतीशील लेखक आणि चळवळीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती परिवर्तनाबद्दलची त्यांची दृष्टी सातत्याने सजग आणि संवेदनशील होती.

            साहित्य सेवेबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमांशी ते जोडले गेले होते. स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमाला अनेक वेळेला त्यांना आम्ही निमंत्रित केले होते. अलिकडच्या काळात ते जरी आजारी असले तरी तल्लख स्मरणशक्तीबुद्धीचातुर्यसमाजाबद्दलचा कनवाळुपणासहृदयता हे सर्व गुण त्यांच्यात कायम जागृत होते. या गुणांची त्यांनी आयुष्यभर जोपासना केली व तसेच ते जीवन जगले. अत्यंत निःस्वार्थी स्वभावाचे व्यक्तीमत्वत्याचबरोबर समाजामध्ये आणि स्वतःमध्ये एक वेगळया प्रकारचे नाते तयार केलेला कार्यकर्तालेखकनेता व संवेदनशील व्यक्ती गमावल्याने कला, साहित्य क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्राचे अपरिमित असे नुकसान झाले आहे, अशा शब्दात उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी डॉ.अवचट यांना श्रद्धांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

'जय हिन्द' से  युवाओं ने छेडे देशभक्ति के तराने

Fri Jan 28 , 2022
नागपुर –  गणतंत्र दिवस की संध्या पुलिस विभाग में विभिन्न पदों पर कार्यरत गायकों ने मधुर गीतों की प्रस्तुति दी और दर्शकों की तालियां बटोरीं. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी एंव हार्मोनी इवेंट्स ने बुधवार को ‘जय हिंद’ यह गीतो का शो गणतंत्र दिवस पर महाराष्ट्र पुलिस नागपुर द्वारा संयुक्त रूप से प्रस्तुत किया गया। कार्यक्रम का आयोजन भाजपा सांस्कृतिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!