संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यतीत शाळा, विना अनुदानित शाळा मध्ये आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी पालकांनी 31 मे 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन कामठी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे यांनी केले आहे.