डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

      मुंबई –  महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीशिक्षण फीपरीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

            त्याचबरोबर 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रृटी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्रृटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती.

            काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजूनही सुरू आहेतत्यामुळे दि. 12 जानेवारीपर्यंत केवळ 1.16 लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत. याचा विचार करूनपात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्तीशिक्षण फीपरीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवरी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही श्री.मुंडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

इंडिया ओपन 2022मधील यशाबद्दल नागपूरकर मालविका बनसोड हिचे पालकमंत्र्यांनी केले अभिनंदन  

Fri Jan 14 , 2022
डॉ. नितीन राऊत यांनी दूरध्वनीवरून केली मालविकाशी चर्चा नागपूर  : इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन स्पर्धेत जगज्जेत्या सायना नेहवालला नागपूरची मालविका बनसोड हिने तिसऱ्या फेरीत चित करुन विक्रमी कामगिरी केली आहे. या विक्रमी कामगिरीची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला प्रत्यक्ष  फोन करून तिचे अभिनंदन केले.             “मालविका तू केलेली कामगिरी तमाम नागपूकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com