– खेलरत्न मेजर ध्यानचंद यांना विनम्र अभिवादन
नागपूर :- हॉकीचे जादूगार खेलरत्न मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका क्रीडा विभाग व परशुराम सर्व भाषिय ब्राह्मण संघ यांच्या वतीने १७ वर्षांखालील शालेय मुली व मुले यांची सहा सदसीय संघ असणारी ” डॉन टु डस्क” ही हॉकी स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन व्हीएचएचे माजी अध्यक्ष बी. सी. भरतीया यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे महासचिव संजय चतुर्वेदी, सर्वश्री महेंद्र भार्गव, विश्वेश्वर मुधोळकर, किशोर जिजकर, हरीश कपूर, विवेक सेरिया, रवींद्र फ्रान्सिस यांच्यासह मनपाचे क्रीडा अधिकारी, डीएसओ, परशुराम संघाचे सदस्य उपस्थित होते. स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर, आयआरएस इंटरनॅशनल, सेंट जॉन हायस्कूल, सेंट व्हीन्सेंट पलोटी, ज्ञान विद्या मंदिर, मदन गोपाल अग्रवाल, किड्स वर्ल्ड, तिडके महाविद्यालय या आठ शालेय संघांनी सहभाग नोंदविला. सर्व स्पर्धकांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.